February 5, 2026

वाळूज महानगर, (ता.1) – मराठा आरक्षणासाठी सर्वत्र रान पेटलेले असताना मराठा आरक्षणा प्रती गरळ ओकणाऱ्या राजकीय नेतेमंडळी सहित मराठा समाजाविरोधात वकिली करणाऱ्या गुणरत्न सदावर्तेची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून वाळुज येथे भडाग्नी देऊन बुधवारी (ता.1) रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान छत्रपती संभाजीनगर ते पुणे या राष्ट्रीय महामार्गावर लांबच लांब रांगा लागल्याने वाहनांची दुतर्फा कोंडी झाली होती.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल सरकार घेत नसल्यामुळे मराठा समाज आक्रमक होत आहे. असे असतानाच

मराठा आरक्षणा प्रती गरळ ओकणाऱ्या छगन भुजबळ, नारायण राणे, सदाभाऊ खोत, रामदास कदम आणि मराठा समाजाविरोधात वकिली करणारा गुणरत्न सदावर्ते या 5 तोंडी रावणाची वाळुज येथे सकल मराठा समाजाच्या वतीने प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढत छत्रपती संभाजीनगर अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर भडाग्नी दिला.

याप्रसंगी सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने राज्य व केंद्र सरकार रोष व्यक्त करण्यात आला.

यावेळी वाळूजसह परिसरातील शिवराई, रामराई, पिंपरखेडा, नायगाव बकवालनगर, लिंबे जळगाव, लांझी, हिरापूर, शिवाजीनगर वाळूज, नारायणपूर येथील मराठा मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.

दरम्यान पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्यासह वाळुज पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला. आंदोलनादरम्यान संभाजीनगर ते पुणे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती.

ती सोडवताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *