
वाळुज महानगर, (ता.28) – वाळूज येथील माजी ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार राऊत (महापौर) व सामाजिक कार्यकर्ते संजय शिंदे यांना जनसेवक पुरस्कार मिळाल्याने त्यांचा वाळूज येथे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
समाज व लोकहितासाठी उत्कृष्ट कार्य केल्याची दखल घेऊन राष्ट्रीय ओबीसी महासंघ व गणेश भाऊ मढीकर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात आलेल्या या जनसेवक पुरस्काराबद्दल वाळुज येथील भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब शिंदे पाटील, भाजपा तालुका सचिव अशोक हिवाळे, पत्रकार आर के भराड, सचिन पानकडे, मनोज साबळे, जनार्धन गांधिले पाटील, अविनाश शिंदे, अमोल शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
