
वाळूजमहानगर, (ता.28) – उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे वाळूज शहरप्रमुख नंदकुमार राऊत यांनी बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटात रविवारी (ता.25) रोजी जाहीर प्रवेश केला. त्यामुळे वाळुज येथील ठाकरे गटाच्या शिवसेनेला खिंडार पडले. यासाठी भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी पुढाकार घेतल्याचे बोलल्या जात आहे.
औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते सत्कार स्वीकारून नंदकुमार राऊत यांनी शिंदे गटात प्रवेश केला. या वेळी तालुकाप्रमुख दिलीप निरफळ, अरूण रोडगे, दिलीपसिंग राजपुत, भातवलकर यांची उपस्थिती होती. वाळूज शहर प्रमुख नंदकुमार राऊत यांनी अनेक वर्ष शिवसेनेत एकनिष्ठतेने काम केले. मात्र गेल्या काही दिवसापासून ते नाराज होते. नेमके हेच हेरुन शिंदे गटाने त्यांना आपलेसे केले. यात भाजपच्या काही स्थानिक नेत्यांचाही मोठा वाटा असल्याचे बोलल्या जाते.
