वाळूजमहानगर (ता.26) :- वाळुज औद्योगिक वसाहतीतील व्हेरॉक कंपनीत प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी फायबर ग्लास वायर व फिक्चर प्लेट. असा 60 हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. ही चोरीची घटना बुधवारी (ता.26) रोजी सकाळी उघडकीस आली.
वाळुज औद्योगिक वसाहतीतील व्हँरॉक कंपनी प्लँन्ट -7 प्लाट एल- 4 या कंपनी मध्ये कोणीतरी अज्ञात चोरट्याने प्रवेश करून कंपनीतील 50 हजार रुपये किमतीचे फायबर ग्लास वायर व 10 हजार रुपये किमतीची फिक्चर प्लेट. असा एकूण 60 हजार रुपये किमतीचा आवाज लबाडीच्या इराद्याने व स्वतःच्या फायद्यासाठी चोरून नेला. मंगळवारी (ता.25) रात्री 1 ते बुधवारी (ता.26) रोजी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान झालेल्या या चोरी प्रकरणी सुरक्षारक्षक अधिकारी कारभारी नारायण दौडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.