March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.6) – सुरू असलेली अतिक्रमण हटाव मोहीम, येणारे सण, उत्सव व निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात बुधवारी 6 ऑगस्ट रोजी पोलिसांनी मोठ्या लवाजम्यासह पथसंचलन केले.

वाळूज एमआयडीसीत दुपारी 12 ते 1:30 वाजेच्या दरम्यान करण्यात आलेल्या या पथसंचलनात आर ए एफ व वाळूज एमआयडीसी पोलिसांचा सहभाग होता. हे पथसंचलन हे रांजणगांव फाटा, कमळापुर फाटा, एकतानगर, एन.आर.बी. चौक, कार्तिकी हॉटेल, वडगांव (को.), छत्रपतीनगर, मोहटादेवी येथे समाप्त करण्यात आले. पथसंचालना करिता आर ए एफ विभागाचे 2 अधिकारी व 38 अंमलदार, वज्र वाहन तसेच वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे 1 पोनि, 3 सपोनि व 27 पुरुष अंमलदार व 3 महिला अंमलदार, । मोबाईल, ।।ता मोबाईल, गोपनिय विभागाचे अंमलदार आदींचा समावेश होता.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *