February 5, 2026

वाळूज महानगर, (ता.26) – वाॅईन शाॅप या वाईन शॉपच्या दुकानाची संरक्षण भिंतीला भगदाड पाडून व चैन कुप्पीच्या साह्याने शटर उचकटून 10 ते 20 हजाराची महागडी दारू व साडेपाच लाख चिल्लर रोख रक्कम असा अंदाजे 5 ते 6 लाखांचा ऐवज लंपास केला. पंढरपूर येथील तिरंगा चौकात झालेली ही घटना रविवारी 25 जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली. या चोरीचा घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे.

छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्गावरील पंढरपूर येथील तिरंगा चौकात हितेश वासू मलकानी यांचे जाॅन नावाने वाॅईन शाॅप आहे. शनिवारी मलकानी हे नेहमी प्रमाणे दुकान बंद करून रात्री घरी गेले होते. दरम्यान मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास चोरट्यांनी या दुकानाच्या विटांचे बांधकाम असलेल्या संरक्षण भिंतीला उजव्या बाजूने मोठे भगदाड पाडले. तसेच चेन कुप्पीच्या मदतीने शटर उचकटून दुकानातील 10 ते 20 हजार रुपये किंमतीची महागडी दारू व रोख चिल्लर साडे पाच लाख रुपये असा सुमारे 5 ते 6 लाखांचा ऐवज लंपास केला.

दुकानमालक हितेश वासू मलकानी हे रविवारी 25 जानेवारी रोजी सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता ही घटना उघडकीस आली. दरम्यान ही माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी व गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच दुकान व परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी करून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला.

घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद –
या चोरीच्या घटनेतील एक चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रीत झाला असून तो रात्री 2 ते अडीच वाजेदरम्यान दुकानाच्या परिसरात फिरताना आढळला. विशेष म्हणजे त्याने कपड्याने तोंड बांधल्याचे सीसीटीव्हीत आढळते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *