
वाळूज महानगर, (ता.14) : -ग्रामपंचायत कार्यालय वळदगाव तर्फे महिला व बालकल्याण विभागाच्या दहा टक्के मधून “कोमल स्वप्न सेवाभावी संस्थेमार्फत” मौजे वळदगाव येथे महिलांना शिलाई यंत्र आणि ब्युटी पार्लर या दोन कोर्सच्या प्रशिक्षणाचे आयोजन बुधवारी (ता.14) रोजी करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला सरपंच अमर कचरुसिंग डांगर, उपसरपंच संजय त्रिंबकराव झळके, ग्रामपंचायत सदस्य गणेश कडूबा नवले, विष्णू रंगनाथ झळके, अशोक रमेश खोतकर, सीमा रितेश पहाडीये, वैशाली विनोद खोतकर, नंदा सुभाष साबळे, गंगा अविनाश घुले, वर्षा महेश घोडके, प्रीती मनेश शिंदे तसेच कोमल स्वप्न संस्थेच्या संचालिका व तिसगाव ग्रामपंचायत सदस्य रेखा सूर्यवंशी, विनोद खोतकर, रितेश पहाडीये, पार्लर शिक्षिका शारदा घायतडकर, शिवनक्लास शिक्षिका मीरा पाठे, राणी साबळे, वैशाली पाठे, संगीता खोतकर, मीना साबळे, नंदा मिरेकर, रेखा पंडित, अर्चना पंडित, राधा गवळी, आनिता लहाने, आरती फेदराम, सुवर्ण बनसोड व गावातील महिला व गावकरी उपस्थित होते.
