
वाळूजमहानगर, ता.15 – छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, अप्पर तहसीलदार नितीन गरजे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत कार्यालय वळदगाव येथे मंगळवारी (ता.15) जानेवारी रोजी विशेष फेरफार आदालतचे आयोजन करण्यात आले होते. 
यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थाच्या समक्ष शेतकऱ्यांना सातबारा व फेरफार वाटप करण्यात आले. तसेच काही ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेण्यात येऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. महसूल मंडळ अधिकारी अभिलाषा म्हस्के, मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी स्वप्निल शेळके, सागर जठार, ज्ञानेश्वर शिरसागर, सायली विटेकर, रश्मी पवार, भगवान पवार यांच्यासह सरपंच अमरसिंग डांगर, उपसरपंच विष्णू झळके, ग्रामपंचायत सदस्य गणेश नवले, संजय झळके, अशोक खोतकर, मंगेश शिंदे, रितेश पहाडीये, राधा मरमट, राजू मुसळे, नितेश चुंगडे, शेख चांदपाशा, उदलसिंग डांगर, विनायक शिंदे, रमेश म्हस्के, अमोल झळके, शिवाजी घुले, कल्याण घुले, दिगंबर साबळे आदींची उपस्थिती होती.
