
वाळुज महानगर, (ता.16) – पावसाच्या सरीत आनंद आणि उत्साहाच्या वातावरणात बजाजनगर परिसरातील शिवछत्रपती विद्यालयात 79 वा स्वातंत्र्य दिन शुक्रवारी 15 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या राष्ट्रीय सणाच्या निमित्ताने शाळेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवछत्रपती विद्यालयाच्या अध्यक्षा तथा मुख्याध्यापिका विद्या भोसले आणि गणमान्य अतिथी म्हणून बालकवी साहित्यिक गणेश घुले हे होते. तसेच संस्थेचे सचिव भोसले सर आणि उपाध्यक्ष जाधव सर यांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली.
प्रथम राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रमुख अतिथी गणेश घुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर अमोल चव्हाण यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचे वृक्षरोप देऊन स्वागत केले.
भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून तसेच क्रांतिवीरांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण विद्यार्थ्यांना व्हावी, त्यांच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता व बंधुभाव निर्माण व्हावा. या उद्देशाने विद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी समूह गाण, म्युझिकल कवायत, अम्ब्रेला पिटी, वीर पुरुषांच्या वेशभूषा, राष्ट्रभक्तीपर गीतांवर डान्स, ड्रामा (ऑपरेशन सिंदूर), वाद्याचे वादन आणि भाषण विद्यार्थ्यांनी आकाशातून पडणाऱ्या पावसाची तमा न बाळगता आनंद व उत्साहाच्या वातावरणात विविध सांस्कृतिक व राष्ट्रभक्तीपर कार्यक्रमाचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकत स्वातंत्र्य दिनाचा उत्साह द्विगुणीत केला. 
अध्यक्षीय भाषणात विद्या भोसले यांनी आपले विचार प्रगट करताना – विद्यार्थ्यांनी छोट्या छोट्या कृतीतून आपण आपली राष्ट्रभक्ती कशाप्रकारे प्रगट करू शकतो. केले. तर प्रमुख पाहुणे गणेश घुले यांनी विद्यार्थ्यांना संबोधून -विपरीत परिस्थितीत आपल्या सर्वांना स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवता आले पाहिजे व काळानुरूप आपल्यामध्ये परिवर्तन घडविता आले पाहिजे. आणि हे सर्व शिक्षणाद्वारेच घडू शकते. असे विचार मांडले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका सारिका डोंगरे तसेच विद्यालयातील विद्यार्थिनी सुजाता साह, प्राप्ती पवार आणि प्राची मोरे यांनी केले. तर आभार गणेश लोंढे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली व शेवटी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
शिवछत्रपती विद्यालयाच्या अध्यक्षा तथा मुख्याध्यापिका विद्या भोसले यांची अनुमती व मार्गदर्शनानुसार झालेल्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक गणेश लोंढे, नागेश कदम, अमोल चव्हाण, सारिका डोंगरे, रेवती तायडे, स्वाती शिरसाठ, संध्या ढवळे, सुरेखा राजमाने, वनिता शिंदे, पुष्पा काटकर, निकिता ताठे, पूजा पवार, निकिता धनुकार, अरुणा खडसे, अश्विनी करंजे, शांती तूपशेंद्रे आदींनी परिश्रम घेतले.
