April 7, 2026

वाळुजमहानगर, (ता.7) – वडगाव (रामपुरी) शिवारात असलेल्या उभ्या विद्युत पोल वरील जवळजवळ साडे चोवीस हजार रुपये किमतीची विद्युत तार अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही चोरीची घटना सोमवारी 6 एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळूज परिसरातील वडगाव (रामपुरी) शिवारातील सांडु भिमाजी प्रधान, सखारम राधाकिसन बरबडे यांच्या शेत गट नंबर 21 व गट नंबर 32 कारभारी आसाराम बनकर यांच्या शेतात उभ्या असलेल्या विद्युत पोलवरील 24 हजार 328 रुपये किमतीची ॲल्युमिनियम विज वाहक तारा कोणीतरी अज्ञात आरोपीने चोरून नेल्या. ही चोरीची घटना सोमवारी 6 एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी तुर्काबाद शाखेचे कनिष्ठ अभियंता शेख मुफिद मकसूद अहेमद यांच्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार अरुण उगले करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *