
वाळुज महानगर, (ता.7) – गंगापूर तालुक्यात ‘जागर भक्तीचा’ या सुसंवाद अभियान या अंतर्गत तालुक्यातील अनेक संत महंतांनी एकत्र येऊन वडगाव रामपुरी ता गंगापूर येथे पुत्रदा एकादशी निमित्त 5 ऑगस्ट रोजी तुर्काबाद खराडी जवळील वडगाव (रामपुरी) येथे नगर प्रदक्षिणा घालून हनुमंतरायाच्या मंदिरात भजन कीर्तनातून गावकऱ्यांशी धार्मिक व सामाजिक सुसंवाद साधला.

‘जागर भक्तीचा’ या सुसंवाद अभियान अंतर्गत गंगापूर तालुक्यातील संत, महंत, हभप एकत्र येऊन प्रत्येक एकादशीला एका वेगळ्या गावात जाऊन भजन, गवळण, कीर्तन अशा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून सामाजिक प्रबोधन करतात. या कार्यक्रमात एक भाग म्हणून तुर्काबाद खराडी जवळील वडगाव (रामपुरी) येथे
मंगळवारी 5 ऑगस्ट रोजी पुत्रदा एकादशीनिमित्त
गावातील महिला, पुरुष, तरुण,भजनी मंडळ यांनी नगरप्रदक्षिणा घालून वडगाव रामपुरी येथील ग्रामदैवत हनुमंतरायांचे पूजन केले. 
या प्रसंगी तुर्काबाद येथील धर्माचार्य हभप डॉ.जनार्दन महाराज मेटे, लिंबे जळगाव येथील श्री सप्तशृंगी मंदिर समितीचे हभप विजय महाराज खेडकर, बजाज नगर येथील हभप बबन महाराज चौरे, शेकटा येथील हभप कृष्णा महाराज भवर, डोमेगाव येथील किशोर महाराज भाटवडे,
आंबेलोहळ येथील प्रवीण महाराज अंकुश आदींनी गावकऱ्यांना धार्मिक आणि सामाजिक विषयाबाबत प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले. कार्यक्रमास गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
