
वाळूजमहानगर, (ता.5) – वडगाव (को.) गट नं. येथील रमेश गिरी यांच्या वतीने उत्तर भारतीय परंपरेनुसार भगवान शिवजी व माता पार्वती यांचे शिव महिमा व भजन कार्यक्रमाचे आयोजन रविवारी (ता.31) रोजी करण्यात आले होते.

सकाळी 11 वाजेच्या सुमारास सुरू झालेला शिवमहिमा सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू होता. त्यानंतर सर्वांनी मिळून बाबा भोलेनाथ आणि माता पार्वतीची आरती करून महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सामाजिक कार्यकर्ता विजया अवस्थी, राजेन्द्र अवतादे, अरुण गिरी, नरेन्द्र यादव, राजेश सिंह, रमेश गिरी, अमोधनाथ प्रजापती, पिंटू सिंह, अरविंद कुशवाहा, धन्नू कुशवाहा, वैजनाथ दास, रविशंकर राय, अभिषेक गिरी, चंचल गिरी, विनोद गिरी, अजय सिंह, सुरज रजक अरविंद सिंह, महंत श्री रामेश्वरानंद पाण्डेय, रविशंकर पाण्डेय, पवन सिंह, बी. के. सिंह, जयसिंह यादव, डी.के सिंह यांच्यासह उत्तर भारतीय महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
