वाळूजमहानगर, (ता.13) – पती पासून विभक्त राहणाऱ्या पंचवीस वर्षीय विवाहित महिलेचा गल्लीत राहणार्या एका इसमाने घरात घुसून तिच्या मनात लज्जा वाटेल असे कृत्य करून विनयभंग केला. ही घटना शनिवारी (ता.10) दुपारी 4 वाजेच्या सुमारास वडगाव (को.) येथे घडली.
वाळूज परिसरातील वडगाव (को.) येथे 25 वर्षीय विवाहित महिला पती पासुन विभक्त होऊन दोन मुलासह राहते. ती वाळूज औद्यागिक वसाहतीतील एका कपंनीत काम करते. या महिलेच्या घराजवळ राहणार्या दिनकर नवल कापडनिस यांच्याशी तीची ओळख झल्यानंतर दोघेही एकामेकांशी बोलत असत. शनिवारी (ता.10) दुपारी 4 वाजेच्या सुमारास पिडीत महिला घरात एकटी असताना दिनकर कापडनिस याने तीच्या घरात घुसून तीच्याशी जवळीक करून तिच्या मनाला लज्जा वाटेल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात मंगळवारी (ता.13) रोजी आरोपी दिनकर कापडणीस विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
