वाळूजमहानगर, ता.24) – वडगाव कोल्हाटी येथील आनंद बुद्ध विहारच्या वतीने विश्वशांतीदुत तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या 2568 व्या जयंतीनिमित्त भव्य धम्म रॅली, खिरदान व भोजदान आधी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रथम सकाळी नऊ वाजता पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करून सामूहिक त्रिशरण पंचशील घेऊन पुज्यनिय भंत्तेगण व प्रमुख मान्यवर रमेश गायकवाड, कृष्णा साळे पाटील, रमेश दाभाडे, समता सैनिक दलाचे विलास पठारे, सिद्धार्थ बनकर, बाबासाहेब जाधव, विजय गायकवाड, रवी लोंढे, गौतम लाटे, जगन्नाथ निकम, नामदेव पठारे, अशोक निकम यांच्या उपस्थित मध्ये धम्म रॅलीची सुरुवात झाली. ही रॅली आनंद बुद्ध विहार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, सावित्रीबाई फुलेनगर, साजापूर वडगाव रोड या मार्गे जाऊन साईबन हाउसिंग सोसायटी या ठिकाणी समाप्त करण्यात आली. यावेळी परिसरातील नागरिकांना रमाबाई तायडे यांनी सामायिक त्रिशरण पंचशील देऊन आनंद बुद्ध विहाराचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी तथागत भगवान बुद्धाच्या जीवनावर सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाला परिसरातील पंचशील बुद्ध विहार आयोध्यानगर, तक्षशिला बुद्ध विहार सलामपुरेनगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती सलामपुरेनगर, सिद्धार्थ बुद्ध विहार च्या नागरिक पांढरे वस्त्र परिधान करून मोठ्या संख्येने
उपस्थित होते. यावेळी एस पी हिवराळे, अण्णा जाधव, ईश्वर लोखंडे, नामदेव केदारे, सुधीर शेषवरे, अनिल साळवे, रवी लोंढे, नरेंद्र त्रिभुवन,
अजय चौतमल, दिपक दळवी, भगवान नरवडे, जीजाबाई कीर्तीकर, गौतम सरोदे, दिलीप साळवे, सुनील साळवे, संजय पठारे, शांतीलाल दिवेकर,
सुनिल कांबळे,, भगवंतराव निकम, उद्योजक संतोष लाठे, संजय तिजोरे, मगन निकम,
सतीश साळवे, किरण चौथमल, महिला समिती कौशल्यबाई निकम, सुरेखा केदारे, गयाबाई साळवे, विमलबाई दळवी, संगीता खरात, दिपाली परकारे, सुनंदा कसबे, संगीता निकम, सविता खरात, अर्चना निकम, रेखाबाई साळवे, सीमा निकम द्वारकाबाई नरवडे शारदा निकम शारदा काळे, पंचशीला बिराडे, सुमन साबळे, रंजना परकारे. रमाबाई दाभाडे, सरुबाई दाभाडे, अलकाबाई हिवाळे उपस्थित होते. भोजनदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी संजय निकम, यशपाल कदम, नामदेव सावंत, अमोल निकम यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी श्रमदान केले. आभार प्रकाश निकम यांनी मांनले.