
वाळूजमहानगर, (ता.26) – वडगाव (कोल्हाटी) येथे जिल्हा परिषद शाळा वर्ग खोल्यांच्या बांधकाम सोहळयाचे भूमिपूजन आरोग्य शिबिराचे उद्घाटन सामाजिक न्याय तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत शुक्रवारी 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता करण्यात येणार आहे.
पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव (को.) येथील जि. प. शाळा वर्ग खोल्याचे 1 कोटी 50 लाख रुपये निधीतून बांधकाम भूमीपुजन
सोहळा होणार आहे. तसेच महात्मा गांधी मिशन रुग्णालयातर्फे आरोग्य तपासणी शिबिरात महिला- बालकांची तपासणी केली जाणार आहे. आरोग्य तपासणीनंतर रुग्णांना औषधींचे वाटप केले जाईल.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर विकास जैन, नंदुकुमार घोडेले, नगरसेवक सिंध्दांत शिरसाट, युवासेना कार्यकारिणी सदस्या हर्षदा शिरसाट यांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाला शिवसेना पदाधिकारी- शिवसैनिकांनी उपस्थित राहावे. असे आवाहन सरपंच सुनील काळे मित्र मंडळ, एमजीएम रुग्णालय, ग्रामपंचायत कार्यालय वडगाव (को.) – बजाजनगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
