वाळूजमहानगर, (ता.28) – सामाजिक न्याय तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव कोल्हाटी येथे जिल्हा परिषद शाळा वर्ग खोल्यांच्या बांधकामाचे भूमिपूजन शुक्रवारी 28 नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन मंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत युवासेना कार्यकारिणी सदस्या हर्षदा शिरसाट, व वडगाव (को.)- बजाजनगरचे सरपंच सुनील काळे यांच्या हस्ते झाले.
यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले, विकास जैन, उपजिल्हाप्रमुख बप्पा दळवी, तालुकाप्रमुख हनुमान भोंडवे, माजी पंचायत समिती सदस्य राजेश साळे, उपसरपंच ज्योती श्रीकांत साळे, ग्रामपंचायत सदस्या मंदा कैलास भोकरे, माधूरी सोमासे, माजी उपसरपंच उषा हांडे, ग्रामपंचायत अधिकारी बी एल भालेराव, पंढरपूर जिल्हा परिषद शाळेचे केंद्रप्रमुख देविदास सूर्यवंशी, पोपट हांडे, राम पाटोळे, शिवाजी गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा परिषद शाळा वडगाव येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी पालकमंत्री संजय शिरसाट म्हणाले की, वडगाव येथील शाळा ही दुमजली असणार असून दहा खोल्या बांधल्या जाणार आहे. त्यासाठी दीड कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आणखी शाळा खोल्या हव्या असल्यास निधी उपलब्ध करून देईल. मात्र शाळेचे काम दर्जेदार आणि शोभनीय झाले पाहिजे. शिवाय शिक्षणाचा दर्जाही चांगला असला पाहिजे. खाजगी शाळेची फीस आणि इतर खर्च करणे शक्य होत नाही.
त्यामुळे या शाळेत गरिबांची मुले शिकतात. या शाळेच्या विद्यार्थ्यांना सर्व सुविधा मिळाल्या पाहिजे. त्यासाठी मी नेहमी प्रयत्न करीन असे आश्वासन दिले. यावेळी सचिन प्रधान, अशोक लगड, दशरथ मुळे, कैलास भोकरे, छाया जाधव, कैलाश चव्हाण,
प्रकाश निकम, सोनवणे महाराज, अजय प्रधान, मयूर साळे, श्रीकांत साळे, निलेश वाहूळ, निलेश जाधव, शुभम काळे, रमेश दाभाडे, अमोल पोटे, नागेश कुकलारे आदींसह शिवसेना पदाधिकारी-कार्यकर्ते, शिक्षक व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. प्रकाश निकम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी आणि पंढरपूर जिल्हा परिषद शाळेचे केंद्रीय मुख्याध्यापक प्रवीण लोहाडे, वडगाव (को.) प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक महेंद्रसिंग बारवाल, हरिश्चंद्र रामटेके, साहेबराव धनराज, राहुल मांडे, रामहरी दहिफळे, लईक शेख, अनिता राठोड, विद्या सोनोने, रीता मार्कंडे, शैला शेंडे, सविता म्हस्के, सचिन एखंडे, शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
