वाळूजमहानगर, (ता.18) – वारंवार सूचना देऊन सुद्धा गुन्हेगारीत सुधारणा होत नसल्याने वडगाव को येथील 32 वर्षीय तरुणाला दोन जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले.
वाळूज परिसरातील सावित्रीबाई फुलेनगर वडगाव (कोल्हाटी) येथील संतोष उर्फ राजू विश्वनाथ झाल्टे, (32) याची वाढती गुन्हेगारी लक्षात घेत त्याला जिल्हत्यातुन दोन वर्षीसाठी तडीपार करण्यात आले आहे. राजू झाल्टे यांच्या विरूध्दात गंभीर गुन्हे दाखल असून त्याचात सुधारणा होत नव्हती. म्हणून त्याला पोलीस उप आयुक्त नितीन बगाटे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्यातून दोन वर्षीसाठी हद्दपार केले. एमआयडीसी वाळूज ठाण्याचे पोलीस निरिक्षक कृष्ण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष यास जालना जिल्यात सोडण्यात आले.