March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.25) – धारदार तलवार व सुरा घेवून दहशत पसरवणाऱ्या 24 वर्षीय तरुणास जीआर बंद करून त्याच्या ताब्यातील तलवार व सुरा अशी शस्त्रे जप्त करण्यात आली. ही कारवाई एमआयडीसी वाळूज पोलीसांनी सोमवारी 24 सप्टेंबर रोजी वडगाव कोल्हाटी येथे केली.


याबाबत मिळालेली माहिती अशी की, वडगाव कोल्हाटी येथील शांताई शाळेजवळ राहणारा आरोपी करण मारोती गायकवाड (वय 24) हा गावात धारदार तलवार व सुरा घेऊन दहशत पसरवीन असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांना मिळाली. या माहितीवरून वाळुज एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी 24 नोव्हेंबर रोजी रात्री त्याला धारदार शस्त्रासह जेरबंद केले.

त्याच्या ताब्यातून एक धारदार तलवार व सुरा असा 3 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई वरिष्ठ निरिक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. पव्रिण पाथरकर, सागर पाटील, पोलीस हवालदार सुरेश कचे, पोलीस अंमलदार राजाराम वाघ, दिपक जाधव, सुयश भिसे, जयेश सोळुके, शिवनारायण नगरे यांनी केली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *