
वाळूजमहानगर, (ता.25) – वाळूज परिसरातील वडगाव कोल्हाटी येथे गेल्या गुरुवारी (ता.20) रोजी गट नंबर 59 मध्ये शेत जमिनीच्या वादातून साळे कुटुंबातील दोन गटात तलवारीने हल्ला झाला होता. 
घटनेतील आरोपींना ही पोलिसांनी ताब्यात घेतले असून आता या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. तलवारीने एकमेकांवर (हल्ला) सपासप वार करत असलेले व अंगावर शहारा आणणारे दृश्य व्हिडिओमध्ये दिसत असून तो व्हिडिओ सध्या वाळूज परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात व्हायरल होत आहे.
या हल्ल्यात दोन्ही गटाचे सहा जण जखमी झाले असून परस्परविरोधी आठ जणांवर वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
