
वाळूजमहानगर (ता.28) :- वाळूज परिसरातील वडगाव (कोल्हाटी) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सोमवारी (ता.28) संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक सुनील चिपाटे यांनी सुरुवातीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर सर्वांनी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. हरिश्चंद्र रामटेके यांनी संविधान स्वरूप व कार्यपद्धती या बद्दल मुलांना माहिती सांगितली. विद्या सोनोने यांनी सूत्रसंचालन केले तर सचिन वाघ यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाला अनिता राठोड, मंगला गाडेकर, सोनाली निकम, अंगणवाडी व पोषण आहार कर्मचारी उपस्थित होते.
