
वाळूजमहानगर – वाळूज परिसरातील वडगाव (को.) येथील 18 वर्षीय नवविवाहितेने राहत्या घरी लोखंडी अँगलला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता.14) रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरती योगेश गाडेकर वय 18 रा. वडगाव (को.) या नवविवाहितेने राहत्या घरी लोखंडी अँगलला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता.14) रोजी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. आरती घरात एकटीच होती. सकाळी ती घरातून बाहेर आली नाही. त्यामुळे दरवाजा वाजवला असता प्रतिसाद न मिळाल्याने मागील दरवाजा तोडून उघडून पाहिले असता आरती बेशुद्ध अवस्थेत होती. तीला लक्ष्मी गाडेकर या महिलेने उपचारार्थ घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून आठ वाजेच्या सुमारास मयत घोषित केले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम वावळे करत आहे.