
वाळूजमहानगर, (ता.2) – काही एक कारण नसताना तीन जणांनी एका 25 वर्षीय तरुणाच्या डोक्यात वजनी माप मारून डोके फोडले. यात तो रक्तबंबाळ झाला. ही घटना सोमवारी (ता.31) रोजी साजापूर येथे दुपारी घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सहजापूर येथील सलीम नवाज सैय्यद (वय 25) हे मजुरी काम करतात. त्यांना अल्ताफ उस्मान शेख, शाहरुख युनुस शेख व सलमान नबी शेख सर्व रा साजापूर यांनी काही एक कारण नसताना डोक्यात वजनी माप मारुन डोके फोडुन जखमी केले. तसेच शिविगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. सोमवारी (ता.31) रोजी दुपारी 4:15 वाजेच्या सुमारास साजापूर येथे झालेल्या या घटने प्रकरणी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
