वाळूजमहानगर (ता.20) – पैशाच्या वादातुन शिवीगाळ करुन हाताचापाटाने व लोखंडी रॉडने मारुन एकास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. बजाजनगर येथे शनिवारी (ता.18) रोजी संध्याकाळी 6.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यातील गंभीर जखमीवर घाटीत उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सुनील फलके रा. ज्ञानदिप विद्यालयाच्या पाठीमागे वडगाव (कोल्हाटी) गट नं- 41, साजापुर वाळूज एमआयडीसी (मुळ रा. लिहाखेडी, ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर. हा शनिवारी (ता.18) रोजी संध्याकाळी 6.30 वाजेच्या सुमारास विठ्ठल रुक्मिनी मंदिराजवळील देवगिरी बँक समोर असलेल्या चव्हाण गॅरेजवर असताना चव्हाण गॅरेज याचे सन्मीत्र ट्रान्सपोर्टकडे गॅरेजचे पैसे बाकी आहे. असे गॅरेज चालक विकी चव्हाण म्हणाला, तेव्हा त्याने विकी चव्हाण यास सांगितले की, तुम्ही ट्रान्सपोर्ट वाल्याकडे तुमचे पैसे मागा, ट्रान्सपोर्ट वाल्याने गाडीच्या कामासाठी गाडी पाठविली आहे, तुम्ही गाडीचे काम करुन द्या. असे म्हणाल्यावरुन विकी चव्हाण याने सुनीलला शिवीगाळ करुन हाताचापटाने मारहाण व लोखंडी रॉड डोक्यात मारुन गंभीर जखमी करुन त्यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. शनिवारी (ता.18) रोजी संध्याकाळी 6.30 वाजेच्या सुमारास झालेल्या या हल्ल्यात सुनील फलके हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सचिन कौतिक हलके यांच्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी गॅरेज मालक विकी चव्हाण यांच्याविरुद्ध कलम 307, 323, 504 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन पागोटे करीत आहे.
