February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.7) – दुचाकीवर जाणाऱ्या 32 वर्षीय तरुणास गावातीलच एकाने लिफ्ट मागितली. मात्र त्यास नकार दिल्याने आरोपीने त्याच्या डोक्यात कोयत्याने व तोंडावर वीट मारून जिवे मारण्याची धमकी देत दिली. ही घटना शेंदुरवादा येथील झोपडपट्टी जवळ बुधवारी (ता.7) रोजी सकाळी साडेदहा वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शेंदूरवादा येथील शिवनाथ निवृत्ती दुबिले (वय 32) हा बुधवारी (ता.7) रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास रस्त्याने जात असताना त्याला शेंदुरवादा येथील झोपडपट्टी समोर
आरोपी सोमीनाथ कचरू माळी रा. शेंदूरवादा हा म्हणाला की, तुझ्या दुचाकीवर मला येऊ दे, त्यावर शिवनाथ दुबिले याने नकार दिला असता सोमीनाथ माळी याने शिवनाथ दुबिले याच्या डोक्यावर हातातील कोयता मारून तसेच तेथे पडलेली वीट उचलून दुबिले याच्या तोंडावर मारून गंभीर जखमी केले. तसेच तुला तीन दिवसात खतम करून टाकतो. अशी धमकी दिली. या प्रकरणी शिवनाथ निवृत्ती दुभिले वय 32, व्यवसाय-शेती. रा. शेंदूरवादा, ता.गंगापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सोमीनाथ कचरू माळी रा. शेंदुरवादा ता. गंगापूर याच्याविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल सुखदेव भागडे करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *