
वाळूज महानगर, (ता.23) – छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील सर्व खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्ण हक्कांची सनद (द चार्टर ऑफ पेशंट राईट्स) ची माहिती दर्शणी भागात लावणे बाबतचा आदेश निर्गमित करावेत. अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे मंगळवारी (ता.23) रोजी करण्यात आली आहे.
अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने युवक जिल्हाध्यक्ष अमोल काळे पाटील यांनी दिलेल्या या निवेदनात असे म्हटले आहे की, छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील प्रत्येक खाजगी रुग्णालयांनी रुग्ण हक्काची सनद व दर पत्रक (द चार्टर ऑफ पेशंट राईट्स) ची माहिती दर्शणी भागात लावणे कायद्याने बंधनकारक आहे. परंतु जिल्ह्यातील बहुतांश रुग्णालयामध्ये रुग्णांच्या हक्काची सनद दर्शनी भागात लावलेली निदर्शनास येत नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जुन 2019 मध्ये सर्व राज्यांमध्ये रुग्ण हक्काची सनद खाजगी व सरकारी रुग्णालयांमध्ये दर्शणी भागात लावण्याचे आदेश जारी केले होते. राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाने सप्टेंबर 2020 आणि मे 2021 मध्ये या विषयी आदेश निर्गमित केले आहेत. कोरोणा काळातील खाजगी रुग्णालयांमधील गैरप्रकार व रुग्णांचे झालेले शोषण आदीची दखल सरकारणे घेऊन राज्याच्या आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्ंयाना आदेश दिले होते. रुग्ण हक्काच्या सनद मध्ये रुग्नाला प्राप्त असलेले अधिकार, आजाराच्या प्रकाराची माहिती मिळण्याचा हक्क, तपासण्यांचे तपशील, उपचारांचे परिणाम, अपेक्षित खर्च, तपासण्यांचे अहवाल व सविस्तर बिले मिळण्याचा हक्क या सारखे अनेक रुग्ण हक्काचा या सनद मध्ये समावेश आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्हृयातील सर्व नोंदणीकृत खाजगी रुग्णालयात 15 दिवसाच्याआत रुग्ण हक्कांची सनद (द चार्टर ऑफ पेशंट राईट्स) ची माहिती तात्काळ दर्शणी भागात लावण्यात यावी व त्या बाबतचा अहवाल कार्यालयास सादर करण्याचे आदेश निर्गमित करावेत. तसेच या आदेशाचे पालन न करणार्या रुग्णालयांचा परवाना रद्द करण्यात यावा.
