March 26, 2026


वाळूजमहानगर, (ता.3) – श्री गुरुदेव सेवा मंडळ बजाजनगर छत्रपती संभाजीनगरच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती ग्रामजयंती उत्सव म्हणून रविवारी (ता. 30) रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या एकदिवसीय उत्सवात सामुदायिक प्रार्थना, कीर्तन, भजन स्पर्धा, नेत्र तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.


उत्सवाचा शुभारंभ सकाळी 6 वाजता सामुदायिक ध्यान पाठाने करण्यात आली. त्यानंतर रामधुन व ग्रामगीता शोभायात्रा काढण्यात आली. वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक सखाराम दिलवाले यांच्या भजन गायनाने भजन स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला. स्पर्धेत 13 भजन संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेत सहभागी पुरुष व स्त्री गायकांनी आपल्या सुरेल स्वरात व संगीताच्या साथीने, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रचित भजने व विविध संतांचे अभंग, गौळण, भारुड सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. आमदार संजय शिरसाट यांच्या हस्ते ग्रामगीता व राष्ट्रसंत रचित भजन पुस्तके देऊन सर्व भजनी मंडळांचा सत्त्कार करण्यात आला. विश्वजीत संगीत महिला भजनी मंडळ एन-9 छत्रपती संभाजीनगर (प्रथम), अष्टविनायक महिला भजनी मंडळ एन-6 मथुरानगर छत्रपती संभाजीनगर (व्दितीय), संत गोरोबाकाका भजनी मंडळ दौल-ताबाद (तृतीय), माता येडेश्वरी भजनी मंडळ पंढरपूर (उत्तेजनार्थ) व गोवर्धन भजनी मंडळ गिरनेर तांडाच्या वनमालाबाई बाविसकर (उत्कृष्ठ खंजिरीवादक) हे संघ बक्षिसांचे मानकरी ठरले. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वांना मंडळातर्फे मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देण्यात आले. परीक्षकाची भूमिका लता दाणे व विनोद वडोदकर यांनी निभावली. मंडळाचे वतीने ग्रामजयंती उत्सवात घाटी रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबीर तसेच नेत्ररोग तपासणी शिबीर घेण्यात आले.

ग्रामजयंतीचे औचित्य साधून सरपंच सुनील काळे यांचा श्री गुरूदेव मंडळ बजाजनगर तर्फे ग्रामगीता देऊन सत्कार करण्यात आला. सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थने नंतर ग्रामगीता- चार्य श्रीकृष्ण सावळे गुरुजी (अकोला) यांचे राष्ट्रीय किर्तन झाले. मंडळाचे अध्यक्ष अनिल अर्डक यांनी आभार व्यक्त केले. राष्ट्रवंदना नंतर महाप्रसाद वितरणाने उत्सवाचा समारोप करण्यात आला. परिसरातील शेकडो नागरिकांनी या उत्सवाचा लाभ घेतला. उत्सव यशस्वीतेसाठी मंडळाचे सर्व पदाधिकारी व सेवकांनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *