March 23, 2026

वाळुज महानगर, (ता.22)- रामोत्सवानिमित्त बजाजनगर

 येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने प्रतिमापूजन व लाडू वाटप होणार आहे.

           श्रीराम जन्मभूमी आयोध्या येथील श्रीराम मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रमानिमित्त बजाजनगर येथे मोठा आनंद उत्सव साजरा करण्यात येत आहे. बजाजनगर येथील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख बप्पा दळवी यांच्या वतीने लोकमान्य चौकात आज सोमवारी सकाळी दहा वाजता श्रीराम प्रतिमेचे पूजन, आरती व लाडू वाटप कार्यक्रम होणार आहे. सर्व राम भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहनही त्यांनी केले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *