March 23, 2026

बजाजनगर, (ता.20) – वाळूज औद्योगिक क्षेत्राजवळच्या रामराई ता. गंगापूर येथे रविवारी रात्री रामदास वाघमारे या शेतकऱ्याच्या घरावर सात ते आठ दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता. तसेच महिला व वृद्ध शेतकऱ्याला मारहाण करून सोन्याचे दागिने चोरून नेले होते. या दरोड्यातील दोन आरोपींना वाळूज पोलिसांनी अटक केली आहे.

याविषयी माहिती देताना तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे यांनी सांगितले की, घटना घडल्यानंतर आम्ही तपासाची सूत्रे जलद गतीने फिरवली. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी सतीश राजू ढोकळे (वय 30), रा. अजवानगर वाळूज व त्याचा साथीदार जगदीश वसंत काळे (वय 20) रा. पत्रा कॉलनी वाळूज या दोघां संशयितांना ताब्यात घेतले.

त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना अटक करण्यात आली असून आज आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. मात्र त्यांचे इतर साथीदार अद्यापही फरार असून त्यांचा पोलिस शोध घेत आहेत. या घटनेचा तपास पो नि राजेंद्र सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली पो उपनि. अजय शितोळे करत आहेत.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *