February 5, 2026
  1. वाळूज महानगर –
    भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्था संचलित राजा शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय बजाजनगर येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून सोमवारी (ता.5) सप्टेंबर रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस. एस. कादरी तर प्रमुख पाहुणे हायटेक इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य गोविंद ढगे होते.
    यावेळी एस. एस. कादरी म्हणाले की, भारताचे उपराष्ट्रपती, राष्ट्रपती अशी दोन्ही पदे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी भूषवून सुद्धा आदर्श शिक्षकाची ओळख त्यांनी जपली. त्यांनी दिलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांच्या स्मरणार्थ 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या भारतीय संस्कृतीत आईनंतर सर्वात महत्त्वाचे स्थान गुरुचे आहे. मुलांना घडवण्यात, त्यांच्या जीवनाला दिशा देण्यात गुरुचा मोठा वाटा आहे. तर प्रमुख पाहुणे गोविंद ढगे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांचे सध्याचे वय हे ज्ञान आत्मसात करण्याच आहे. या वयात विद्यार्थ्यांनी आपल्यामध्ये असणाऱ्या क्षमतेचा उपयोग विधायक कामासाठी करावा व आपले उज्वल भवितव्य घडवावे. याप्रसंगी विद्यार्थी व शिक्षकांनीही आपापले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रंजना बावचे, शारदा खरात, के पी मोरे, अनिता बोबडे, माधुरी बहिरट, गोपीचंद गायके, प्रकाश सोनवणे आदींनी प्रयत्न केले.
    फोटो ओळ – राजा शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना अभिवादन करताना डॉ.एस. एस. कादरी, प्राचार्य गोविंद ढगे आदी.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *