February 5, 2026

 

वाळूज महानगर – क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय हिंगोली जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने 17 व 18 ऑक्टोंबर 2025 रोजी हिंगोली जिल्हा दांडेगाव तालुका येथील छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात होणाऱ्या धनुर्विद्या स्पर्धेसाठी बजाजनगर येथील राजवीर जाधव याची निवड झाली असून तो स्पर्धेसाठी रवाना झाला आहे.

शालेय विभागीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये 19 वर्षे वयोगटात ज्ञान भवन इंग्लिश स्कूल बजाजनगरचा राजवीर कैलास जाधव हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व विभागीय स्पर्धेत करणार असून 19 वर्ष वयोगटामध्ये राजवीर जाधव याने विभागीय धनुर्विद्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून राज्य स्पर्धेसाठी विभागाचे नेतृत्व करण्याचा निश्चय केला. विभागीय धनविद्या स्पर्धेसाठी उद्योजक हनुमान भोंडवे पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, वैभव पवार, ज्ञानभवन इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका शारदा बडे, क्रीडा अधिकारी रामकिसन मायंदे, डॉ. रेखा परदेशी, सुजाता गुल्हाने, पुनम नवगिरे, गीता साखरे, सचिन पुरी, गणेश पाळवदे, सदानंद सावळे, गंगापूर तालुका क्रीडा संयोजक शेख शकिल, बीएसएफचे चंद्रशेखर जाधव, समाधान हराळ, डी. पवार यांनी या खेळाडूना विभागीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. राजवीर जाधवला राष्ट्रीय पंच अशोक जंगमे, भीमराज रहाणे यांचे मार्गदर्शन लाभले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *