
वाळूजमहानगर, (ता.4) :- दिवस रात्र काबाडकष्ट करून आईवडील मुलांच्या भविष्याचा विचार करत असतात. त्यांच्या कष्टाचे चीज व भविष्यात काहीतरी करून दाखवायचे, ही जिद्द उराशी बाळगत रांजणगाव (शेणपुंजी) येथील श्री गजानन ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांने आयआयआयटीत प्रवेश मिळवत थेट बेंगलोर येथे भरारी घेतली.
रांजणगाव (शेणपुंजी) येथील श्री गजानन ज्युनिअर कॉलेज मधून 12 वी बोर्ड विज्ञान शाखेतून प्रथम आलेला शुभम बाबासाहेब गायके या विद्यार्थ्यास आय आय आय टी (IIIT) बंगलोर या संस्थेत आर्किटेक्चर प्रोग्रॅम या कोर्स साठी शिष्यवृत्तीसह प्रवेश मिळाला आहे.
या संस्थेच्या प्रवेशासाठी शुभमने JEE Main मध्ये 92 टक्के गुण प्राप्त करून JEE Advance परीक्षेसाठी प्राप्त झाला असून 70 टक्के गुण मिळाले. व सोबतच MHTCET-PCM परीक्षेत 89 टक्के गुण प्राप्त केले. विशेष म्हणजे शुभमने नीट परीक्षेत सुद्धा 487 गुण प्राप्त करून उत्तुंग भरारी घेतली आहे.
शुभमने आपले मनोगत व्यक्त करताना राबविण्यात येणाऱ्या श्री गजानन ज्युनिअर कॉलेजच्या पॅटर्नमुळे उज्वल यश संपादन केले, यशाची वार्ता सर्व तालुक्यात पसरली आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आय जी जाधव, सचिव हरीश जाधव, कॉलेजचे प्राचार्य डॉ. महेश शिनगारे व
श्री गजानन विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सुरेखा बस्वदे,
माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एम व्ही शिनगारे, बसवंतराव पाटील इंग्लिश स्कूलचे बी व्ही शिरसाठ, रेखा बिदरकर, मीरा देशपांडे, प्रा. संजय तुपे, हनुमान जाधव, शहाजी मंगनाळे, शिक्षक,पालकवर्ग यांनी शुभमचे स्वागत करत कौतुक केले.
