March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.15) – रांजणगाव (शे. पु.) येथील ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद शाळेत शुक्रवारी 15 ऑगस्ट रोजी भर पावसात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम सरपंच योगिता प्रभाकर महालकर यांचे हस्ते सकाळी 7.30 वाजता ग्रामपंचायत कार्यालयावर ध्वजारोहण करुन स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.

यावेळी ग्रामविकास अधिकारी गणेश धनवई. पचायत समिती सदस्य दिपक बडे. ग्रामपंचायत सदस्य दत्तु हिवाळे, पंकज हिवाळे. नंदिनी संतोष लोहकरे, साईनाथ जाधव, कविता बाबुराव हिवाळे, सायराबानो जावेद सय्यद, कांता अशोक जाधव, मोहनीराज धनवटे, संजिवनी दिपक सदावर्ते, आश्विनी कैलास हिवाळे, सत्यशिला शहाजी सुरुंग, संदिप मनोहरे, भिमराव किर्तीकर, नंदाबाई हरेराम बडे, निर्मला बबन पठाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ग्रा. प कर्मचारी अंगणवाडी, सेविका मदतनीस, आशा सेविकासह मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व गावकरी उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *