March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.4) – रांजणगाव (शेणपुंजी) येथील श्री गजानन प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदिर, श्री गजानन ज्युनिअर कॉलेज, बसवंतराव पाटील इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाने करण्यात आली.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष आय. जी. जाधव, सचिव हारीश जाधव, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सुरेखा बस्वदे, रेखा बिदरकर, एम.व्ही.शिनगारे, बी.व्ही.शिरसाट, हनुमंत जाधव, उपमुख्याध्यापक शहाजी मंगनाळे, प्राथमिक विभागप्रमुख कल्याण कुलकर्णी, मनीषा नवथर, माध्यमिक विभागप्रमुख संजय तुपे आदींची उपस्थिती होती. प्रथम शाळेतून सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या वेशभूषेत भव्य रॅली काढण्यात आली. याप्रसंगी शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांची वेशभूषा परिधान करून रॅलीत सहभाग नोंदविला. या रॅलीत ढोल पथक, झांज पथक, लेझिम पथकाने रॅलीची शोभा वाढवली. यावेळी प्राथमिक मुख्याध्यापिका सुरेखा बस्वदे यांनी मार्मिक भाषेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षिका वैष्णवी लोळे यांनी गीत गायन केले. तसेच ओजस्वी लोहार, ऋतुजा वाघमारे, श्रेया शेंडगे, वैदही रक्ताटे, दिव्या पढार, शुभांगी कडेकर, दर्पण मेश्राम ,संस्कृती गायकवाड, तेजल काबरा, श्रुती डहाळके, अश्विन आहेर, अनुष्का पांचाळ या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुलाब मोहिते तर आभार संजय तुपे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक तारडे, संदीप हिंगणकर, संजय तुपे, परमेश्वर गीते, विशाल जाधव, सौरभ लगड, सुनील शिंदे, उल्हास वाघ, संभाजी जाधव, मनीषा नवथर, अश्विनी सूर्यवंशी, उज्वला सवई, गंगासागर बोराडे, संजीवनी चिकाळे, आश्र्विनी सूर्यवंशी, स्वाती सूर्यवंशी, छाया वागदरे, निकिता देशमुख, जयश्री पाटील, अश्विनी थोरात, निलेश पाटील, दीपक कोळी, दीपक पठारे, सुभाष जाधव, पूजा गिरी, जब्बार पठाण, प्रल्हाद मंगनाळे आदींनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *