March 23, 2026

 

वाळूजमहानगर, (ता.26) – श्री शिवाजी विद्यालय रांजणगाव (शे.पुं.) ता.गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर येथे श्री शिवाजी प्राथमिक शाळा, खोकडपूरा, व श्री शिवाजी विद्यालय, रांजणगाव(शे.पुं.) ता. गंगापुर यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेत पालक सभेचे आयोजन शनिवारी (ता.25) रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका आशा गवळी होत्या. तर प्रमुख पाहुणे व प्रमूख मार्गदर्शक म्हणून मुख्याध्यापक अनिलकुमार घारुळे होते.

यावेळी पर्यवेक्षिका सरोज पवार उपस्थित होत्या. या पालक सभेत अनेक पालक व महिला पालक उपस्थित होते. सभेत विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी पालक व शिक्षक यांनी कसं काम करायचं त्यांची मार्गदर्शक तत्वे ठरविण्यात आली.
यावेळी दामिनी पथकप्रमुख लता जाधव, निंबोरकर मॅडम व मनीषा बनसोडे यांनी पालक व विद्यार्थ्यांना कायद्याचे ज्ञान, वाहतूक नियम, कमांड अँड कंट्रोल, भरोसा सेल, सायबर क्राईम, मोबाईल पासून फसवणूक कशी केली जाते व योग्य वेळेत फसवणूक पासून सावधगिरी कशी घ्यावी, मुलींनी स्वतःचे निर्भयपणे संरक्षण कसे करावे तसेच सेल्फ डिफेन्स याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच मुलींसाठी
पोलीस आयुक्तालयात राबविण्यात येत असलेल्या विनाशुल्क कराटे प्रशिक्षण. या उपक्रम बाबत माहिती दिली. याशिवाय गुड टच बॅड टच, आई-वडिलांचा व गुरुजींचा आदर करणे व संकटकाळासाठी पोलीस हेल्पलाइन नंबर देऊन डायल 112 बाबत माहिती सांगीतली.


यावेळी स्मार्टफोन, त्यामधून होणारे गैरप्रकार याविषयी सविस्तर मार्गदर्शन लता जाधव, निंबाळकर व मनीषा बनसोड यांनी केले. शाळेचे मुख्याध्यापक अनिलकुमार घारुळे यांनी मुलाविषयी पालकांनी कोणती काळजी घ्यावी व नविन शैक्षणिक धोरणानुसार मुलांसाठी पालक शिक्षक कसे जबाबदार आहेत. याची सविस्तर माहिती दिली. मारुती सुरणर यांनी मुलांच्या व पालकांच्या समस्या विषयी पालकांना मार्गदर्शन केले. श्रीमती गवळी यांनी अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर कौशल्य यांनी तर आभार महेश नागेश्वर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मारुती राठोड, प्रल्हाद राठोड, गणेश गिरे, गणेश कदम, महेश धोटे, दत्ता मुलगिर, सुनंदा पवार, ताराबाई जाधव, सतिश जावळे, विजय बनकर यांनी सहकार्य केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *