February 5, 2026


वाळुज महानगर, (ता.7 ) – रांजणगाव (शेणपुंजी) येथील ग्रामपंचायत कार्यालयात महर्षी वाल्मिकी ऋषी यांची जयंती मंगळवारी 7 ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

प्रथम सरपंच योगिता प्रभाकर महालकर यांच्या हस्ते महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य नंदिनी संतोष लोहकरे, पंकज गोरखनाथ हिवाळे, कविता बाबुराव हिवाळे, सय्यद सायराबानो जावेद, साईनाथ बाबुराव जाधव, कांता अशोक जाधव, संजीवनी दिपक सदावर्ते, मोहनीराज मुरलीधर धनवटे, संदीप सीताराम मनोहरे, अश्विनी कैलास हिवाळे, सत्यशिला शहाजी सुरूंग, नंदाबाई हरेराम बडे, निर्मला बबन पठाडे, भिमराव फकिरराव किर्तीशाही, ग्रामविकास अधिकारी गणेश धनवई यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी सुधाकर बोकन, किशोर काळवणे, किशोर गवळी, गणेश गायके, नवनाथ शिंदे, बाळु कुराडे, दिपक पंडित, संतोष जैस्वाल, गीता वाघ आदींची उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *