March 23, 2026


वाळूजमहानगर (ता.07) – एका 22 वर्षीय तरुणीने बहिणीच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (ता.6) दुपारी 2 वाजेच्या सुमारास रांजणगाव शेणपुंजी येथे उघडकीस आली. मात्र तिच्या आत्महत्येचे कारण समजु शकले नाही.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रुपाली शेषराव तुपे (22), तिची आई सुनीता तसेच तिच्या दोन विवाहित बहिणी शितल बोडखे व मनिषा पवार या कुटुंबासह रांजणगाव (शेणपुंजी येथील) गांधीनगरात एकाच इमारतीतील वेगवेगळ्या रूम मध्ये राहत होत्या. सोमवारी (ता.6) दुपारी रुपाली ही बहिण शितल बोडखेच्या रुममध्ये गप्पा मारण्यास गेली होती. दुपारी 2 वाजेच्या सुमारास रुपाली हिने किचन रुममध्ये जाऊन दरवाजा बंद केला. दरम्यान, बराच वेळ झाला तरी रुपाली घरात न दिसल्याने तिची बहिण शितल व आई सुनिता यांनी किचनचा दरवाजा ठोठावला. मात्र आतुन प्रतिसाद आला नाही. यामुळे दोघींनी आरडा-ओरडा केला असता शेजार्यांनी किचनरुमचा दरवाजा तोडून आसता किचन रुममधील पंख्याला रुपाली ही ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. घटनेची माहिती मिळताच उपनिरीक्षक गणेश गिरी, पोकॉ.नितीन इनामे, किरण पैठणकर, स्वप्निल अवचरमल यांनी घटनास्थळी धाव घेत तिला बेशुद्ध अवस्थेत उपचारार्थ घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *