
वाळूजमहानगर, (ता.25) – वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे नमो चषक 2024 भव्य क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते बुधवारी (ता.24) रोजी मोठ्या उत्साहात झाले.
यावेळी सरपंच योगिता महालकर, पंचायत समिती सदस्य दीपक बडे, उपसरपंच शिवराम ठोंबरे, ग्रामपंचायत सदस्य दीपक सदावर्ते, बाबुराव हिवाळे, साईनाथ जाधव शरद कीर्तिकर, पंचायत समिती सदस्य कृष्णा सुकासे, सोमनाथ नेमाने, रामेश्वर मालुसरे अविनाळ गायकवाड, पंकज हिवाळे, गोरख शेळके, दत्तू हिवाळे, श्याम शेळके अभिषेक माने, किरण धिरडे, गणेश हिवाळे, भीमराव कीर्तिकर, अमर तरटे उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये कबड्डी स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 31 हजार, द्वितीय पारितोषिक 21 हजार व तृतीय पारितोषिक 11 हजार असे आहे.
स्पर्धेमध्ये एकूण 85 संघाने सहभाग नोंदवला. खेळ खेळणाऱ्या सर्व स्पर्धकांना आमदार प्रशांत बंब यांच्या वतीने स्पोर्ट्स किट देण्याचे आश्वासित केले. ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देऊन नमो चषकाच्या माध्यमातून व्यासपीठ तयार करून देण्यात आले, यातून ग्रामीण भागातील खेळाडू राष्ट्रीय स्तरावर पोचवावे या उद्देशाने नमो चषकाचे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून 85 हजार युवक नमो चषकास जोडल्या गेले. असल्याचे पंचायत समिती सदस्य दीपक बडे यांनी सांगितले.
