वाळूज महानगर – रांजणगाव (शेणपुंजी) येथे मारहाण झाल्याने गंभीर जखमी झालेल्या एका 38 वर्षीय इसमाचा उपचारादरम्यान बुधवारी 17 डिसेंबर रोजी मृत्यू झाला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शिवाजी उध्दव धुमाळ ra.शेवगा ता. परतुर जि. जालना हा रांजणगाव शेणपुंजी येथे राहतो. त्याला मंगळवारी 16 डिसेंबर रोजी रात्री 7 वाजेच्या सुमारास मारहाण झाल्याने आमेकार धुमाळ यांनी शासकीय रूग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना बुधवारी 17 डिसेंबर रोजी पहाटे 3:50 वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अशोक जाधव करीत आहे.
