March 24, 2026


वाळूज महानगर, (ता.23) – घरगुती कारणावरून पतीसोबत भांडण झाल्याने 26 वर्षीय महिला घरात कोणाला काही न सांगता निघून गेली. ही घटना रविवारी (ता.21) रोजी दुपारी वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे घडली.


याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, लहु एकनाथ जाधव, वय 30 वर्ष, व्यवसाय खा. नौकरी, रा. चाळीसगाव ता. जि. जळगाव, ,(ह.मु. बाळकृष्ण पेट्रोलपंप जवळ रांजणगाव (शेणपुंजी) ता. जि. छत्रपती संभाजीनगर पोलीसात माहिती दिली की, रविवारी (ता. 21) रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास मनिषा व मुली घरी असतांना पत्नीसोबत घरगुती कारणावरुन भांडण झाले होते. त्यामुळे ती रागाच्या भरात कोणास काहीएक न सांगता घरातुन निघुन गेली. तीचा वाळूज परिसरात व इतरत्र शोध घेतला. परंतु ती मिळुन आली नाही. मनिषा लहु जाधव वय 26 वर्ष, शिक्षण 12 वी, रंग गोरा, उंची 5 फुट 4 इंच, चेहरा गोल, नाक चपटे, डोळे काळे, केस काळे, कान मोठे, अंगात पिवळ्या रंगाची साडी, पायात लाल रंगाची चप्पल, भाषा मराठी, हिंदी बोलते, उजव्या हातावर इंग्रजीमधे दया नाव गोंधलेले. असे तीचे वर्णन आहे. याबाबत वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राम तांदळे करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *