February 5, 2026

 

अपहरणवाळूजमहानगर, ता.11 – अकरावी सायन्सच्या वर्गात शिकणाऱ्या एका सोळा वर्षीय विद्यार्थिनीचे कुणीतरी अज्ञात आरोपीने अज्ञात करण्यासाठी अपहरण केले. ही घटना वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे गुरुवारी (ता.9) रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रांजणगाव शेणपुंजी येथील कावेरी कुंदन पवार (वय 15 वर्षे 11 महिने) ही राजश्री शाहू विद्यालयात अकरावीचे शिक्षण घेते. गुरुवारी (ता.9) रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास कावेरी व तिचा भाऊ ज्ञानेश्वर पवार है घरी असतांना कोणास काही एक न सांगता तिने घराची बाहेरची कडी लावुन निघुन गेली. ही माहिती ज्ञानेश्वर याने वडिलांना फोन करुन सांगितल्यानंतर पवार कुटुंब व नातवाइकानीं कावेरी हिचा राजणंगाव परिसरात, व इतर नातवाइकाकडे तसेच बसस्टँड, रेल्वेस्टेशन आदी ठिकाणी शोध घेतला. परंतु ती मिळून आली नाही. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिचे वर्णन असे –
नाव-कावेरी कंदन पवार, वय – 15 वर्षे 11 महिने 3 दिवस, रांजणगाव (शेंपुं) येथे अकरावीच्या वर्गात शिक्षण सायन्स शिकते. गोरा रंग, उंची अंदाजे 4.5 फुट, शरीर बाधा सडपातळ, अंगात-पांढ-या रंगाचा टॉप व काळ्या रंगाची पॅन्ट, पायात पांढ-या रंगाची सँण्डल, मराठी, हिन्दी, इग्रजी भाषा बोलते. तिच्या गळ्यावर व मानेवर तीळ हे ओळख चिन्ह आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *