March 23, 2026


वाळूज महानगर (ता.16) : – रांजणगाव येथील एका 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचे कोणीतरी अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी अपहरण केले. ही घटना सोमवारी (ता.13) रोजीदुपारी उघडकीस आल्याने तिच्या पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

अंजुषा अनिल जमधाडे (17) या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती बारावीच्या वर्गात शिक्षण घेते. सोमवार (ता.13) रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास अंजुषा ही बाहेर जाऊन येते, असे म्हणून घराबाहेर पडली होती. आता असल्याचे दुपारी दोन वाजेच्या सुमारास उघडकीस आले. तसेच ती सांयकाळी उशिरापर्यंत अंजुषा ही घरी न परतल्याने तिच्या पालकांनी सर्वत्र तिचा शोध घेतला. मात्र अंजुषा कुठेही मिळून न आल्याने तिचे वडील अनिल जमधाडे यांनी तिचे अपहरण झाल्याची तक्रार दिली आहे. या प्रकरणी अज्ञात अपहरणकर्त्याविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर जायभाय करीत आहे.
———————-

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *