February 5, 2026


वाळुज महानगर, (ता.30) – रस्त्यातील खड्ड्यात पडल्याने झालेल्या अपघातात 45 वर्षीय दुचाकीस्वार जखमी झाला. हा अपघात इसारवाडी फाटा ते पैठण रोडवरील मुरमी गावाजवळ झाला. शनिवारी 29 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातातील जखमीला उपचारार्थ वाळूज येथे दाखल करण्यात आले आहे.

या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की, जिकठाण येथील संतोष भानुदास जाधव (वय 45 वर्ष) हे शनिवारी 29 नोव्हेंबर रोजी दुचाकी (एम एच 20, जीटी -1402) वरून इसारवाडी फाटा ते पैठण हायवेने गुरुधानोरा येथून जिकठाणला जात होते. मुरमी गावाजवळ रोडवर पडलेल्या मातीच्या ढिगाऱ्याचा अंदाज न आल्याने त्यावर जाऊन धडकले. त्यामुळे झालेल्या अपघातात संतोष जाधव हे गंभीर जखमीं झाले. रात्री 10 वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघाताची माहिती मिळताच जाधव यांना जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी नाणिजधाम यांच्या 24 तास सेवेत असणाऱ्या विनामूल्य ॲम्बुलन्सचे पायलट संदीप त्रिंबके यांनी वाळूज येथील लघाणे हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

खड्ड्यात पडून झाला अपघात –
या रोडवर सीएनजी (CNG) गॅस पाईप लाईनचे काम चालू आहे. त्यासाठी खड्डे खोदण्यात आले आहे. या खड्ड्यातील माती व मुरूमाचे ढिगार रस्त्यामध्ये तसेच असल्यामुळे संतोष जाधव यांची दुचाकी खड्ड्यात पडली आणि अपघात झाला असल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून समजते. रात्रीच्या वेळी या खड्ड्याच्या ठिकाणी काहीतरी संरक्षित करण्यात यावे. अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *