March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.26) – एकमेकांच्या अंगावर रंग टाकून, हास्य विनोद करत होळी, धुलीवंदन हा सण साजरा करावयाचा असतो. मात्र वाळूज परिसरात हा सण रंगाने नव्हे तर दारू पिऊन साजरा करण्यात आल्याचे चित्र पहावयास मिळाले. ड्राय डे च्या दिवशीच दारूचा महापूर आल्याने वाळुज एमआयडीसी पोलिसांनी दारू विक्रेत्याची चांगलीच उतरवत 2 हजार 749 बाटल्यांमधील पावणे दोन लाख रुपयाची देशी विदेशी दारू जप्त केली.

रंग बरसे भीगे चुनरवाली रंग बरसे. या सुमधुर गाण्याच्या ठेक्यावर होळीचा सण साजरा केला जातो. नव्हे आजपर्यंत तो साजरा करण्यात आला आहे. तशी ती रीतच आहे. मात्र आजची तरुणाई या चालीरीतीला फाटा देऊन भलत्याच वाटेला भरकटल्याचे दिसून येत आहे. यावर्षीची होळी रविवारी आणि सोमवारी धुलीवंदन असल्याने सर्वांनाच या सणाचे वेद लागले होते. त्यामुळे अनेकांनी दोन दिवसापासूनच या सणाची तयारी केली होती. काही अपवाद तरुण मंडळी तसेच महिला वर्ग वगळता अनेक तरुणांनी या होळी आणि धुलीवंदनाचा वेगळाच अर्थ काढत पारंपारिक पद्धतीने रंग खेळून नव्हे तर दारू पिऊन मस्ती करण्यावरच भर दिला. विशेष म्हणजे वाळूज परिसरातील अवैध दारू विक्रेत्यांनीही मुबलक दारू उपलब्ध करून दिल्याने मदिरापान करणाऱ्यांची अधिकच चंगळ झाली. त्यामुळे कालचा होळी धुलीवंदना निमित्त जाहीर करण्यात आलेला ड्रायडे पुरता कोलमडून पडला. या ड्राय डे च्या दिवशीच अनेकांनी थर्टी फर्स्ट सारखी मनसोक्त दारू रिचवली. जणू काही वाळूजमहानगरात दारूचा महापुरच आला असा भास होत होता.
वाळूज महानगरात पोलिसांचे धाडसत्र
ड्रायडे म्हणजे दारू विक्री किंवा सार्वजनिक ठिकाणी पिण्यास बंदी असा ढोबळ अर्थ होतो. मात्र याच ड्रायडेला तिलांजली देत वाळूजमहानगरातील दारू विक्रत्यांनी मनमानी केल्याने अनेकजण झिंगताना दिसून आले. त्यामुळे एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे निरिक्षक कृष्णा शिंदे याच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारू विक्रीत्या विरोधात धाड सुरू केले. सोमवारी (ता.25) रोजी सकाळी सुरू झालेले हे धाडसत्र रात्री उशीरा पर्यंत सुरू होते. दरम्यान एमआयडीसी वाळूज पोलीसांनी रांजणगाव येथील जुनी पिच्चर टाकी, सावता माळी मंदिर परिसर, एकतानगर, वडगांव कोल्हाटी, पंढरपुर येथील तिरंगा चौक, कामगार चौक, तिसगाव येथील खवड्याडोंगर, जोगेश्वरी तसेच वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वाळूज येथील अण्णाभाऊ साठेनगर, बाजार तळ आदी ठिकाणी धाड सत्र मोहिम राबविली. यावेळी आरोपी अर्जून राजु काळे, सागर अर्जुन चव्हाण, सतिश वसंत साबळे आदींवर एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. या कारवाईमुळे वाळूज महानरागतील अवैध दारू विक्रत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
पावणे दोन लाखाची दारू जप्त
धुलीवंदना निमित्त ड्राय डे घोषीत असतानासुध्दा वाळूज महानगरात मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री होताना दिसून आल्याने एमआयडीसी वाळूज पोलीसांनी विविध ठिकाणी छापेमारी करत 2749 बाटल्यांमधील 1 लाख 77 हजार 855 किमतीची देशी विदेशी दारू सह बियर जप्त केली.
  यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस निरिक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मनोज शिंदे, पोउपनि प्रविण पाथरकर, चंद्रकांत कामटे, अशोक इंगोले, संदिप शिंंदे, पोह बाळासाहेब आंधळे, राजाभाऊ कोल्हे, पोलीस अंमलदार सुरेश भिसे, नितीन इनामे, शेख राजु आदीनी केली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *