वाळूजमहानगर – बजाजनगर येथील युरेका इन्फोसीस स्कूलच्या मुलींनी पहिल्याच प्रयत्नात विभागीय फेरीत प्रवेश मिळवत शालेय हॉकीमध्ये एक मोठे यश मिळवले आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या क्रीडा संकुल गारखेडा परिसरात 14 ते 15 ऑक्टोबर दरम्यान झालेल्या शालेय हॉकी स्पर्धेत त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विरोधी संघांना एकतर्फी पराभूत केले. या स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या सौजन्याने करण्यात आले होते. युरेका स्कूलने 19 वर्षाखालील गटात सहभाग घेतला आणि आपल्या कौशल्यपूर्ण खेळाने स्पर्धेचा ठसा उमटवला. त्यांच्या पहिल्या सामन्यात त्यांनी इन्फोसिस स्कूल डिफेन्स अकॅडमीला 4-0 ने पराभूत केले. युरेका स्कूलने गीता गुरुकुलचा सामना केला. या सामन्यात त्यांनी अतिशय जबरदस्त खेळ दाखवत गीता गुरुकुलला 6-0 ने पराभूत केले. या विजयानंतर युरेका स्कूलचा संघ विभागीय स्तरावर स्पर्धा खेळणार आहे, ज्यासाठी त्यांना पात्रता मिळाली आहे. युरेका स्कूलच्या या उल्लेखनीय यशामुळे शाळेचा गौरव झाला असून संपूर्ण संघाचे
युरेका स्कुलचे संस्थापक सुनील पाडळकर, गौतम चोपडा, गौरव लोढा, घुगे, शीतल लोढा, स्कुलच्या प्राचार्या प्रज्ञा मँडम यांनी स्वागत केले.