March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.30) – बजाजनगर येथील युरेका स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन कौटुंबिक थीमवर नृत्य तसेच कृष्ण लीला, देशभक्तीपर गीत, मनोरंजनात्मक नृत्य अशा विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात झाले. कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे सी. ए. केदारपांडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आले.


कार्यक्रमाची सुरुवात शास्त्रीय नृत्याने झाली. यानंतर छोट्या चिमुकल्यांनी कुटुंबातील सदस्यांचे महत्त्व पटवून देत कौटुंबिक थीमवर नृत्य सादर केले. तसेच कृष्ण लीला, देशभक्तीपर गीत, मनोरंजनात्मक नृत्य अशा विविध प्रकारचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. थोर क्रांतिकारक वि दा सावरकर यांच्यावर आधारित नाटिकेतून स्वतंत्रसंग्रामाचे सादरीकरण करण्यात आले. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा कार्यक्रमाचा आकर्षक केंद्रबिंदू ठरला. मातांवर आधारित नृत्य सादरीकरणादरम्यान आई पालकांनी उत्साहाने त्यांच्या मुलांसोबत नृत्य सादरीकरण केले. शेवटी हॉरर नृत्याने पालकांचे मन जिंकले. एकापेक्षा एक सरस सादरीकरणाने वार्षिक स्नेहसंमेलनात रसिक मंत्रमुग्ध झाले.


याप्रसंगी शाळेचे संस्थापक सुनील पाडळकर, गौतम चोपडा, सचिन घुगे, गौरव लोढा यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे प्राचार्य व शिक्षक आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *