March 23, 2026

वाळुजमहानगर, (ता.8) – बजाजनगर येथील युरेका इन्फोसिस स्कूलमध्ये 5 एप्रिल रोजी रामनवमी साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक भावना वाढविण्यासाठी शाळेतील विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. ज्यामध्ये रामायणावर आधारित नाटक तसेच नृत्य आणि भजनाचा समावेश होता.

यावेळी रामायणाच्या विविध प्रसंगाचे देखावे सादर करण्यात आले. ज्यामुळे मुलांना रामायणातील पात्रांबद्दल अधिक माहिती मिळाली. रामायणामध्ये ज्याप्रमाणे रावणाने सीतेचे हरण केले. तसेच कलियुगामध्येही कशा प्रकारचे रावण आहेत. याचे उत्कृष्ट प्रात्यक्षिक छोट्या कलाकारांनी आपल्या कलेतून दर्शविले. शाळेतील शिक्षक आणि सर्व विद्यार्थ्यांनीही या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. या उत्सवाने शाळेमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *