
वाळुज महानगर, (ता.15) – यशवंत पब्लिक स्कूल इंद्ररस्थ कॉलनी, बजाजनगर येथे 79 वा भारतीय स्वातंत्र्य दिन शुक्रवारी 15 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रामदास लाहबर यांच्या हस्ते धोजरोहन करण्यात आले.या प्रसंगी वडगाव (को.)- बजाजनगरच्या माजी सरपंच छाया कारले, छत्रपती संभाजीनगरचे पंचायत समिती सदस्य लक्ष्मण लांडे पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका समन्वयक बाळासाहेब कारले, चंद्रकांत जाधव, कुमार माळवे, निलेश राणे व महिला बचत गटाच्या जाधव ताई व शाळेचे अध्यक्ष नीलेश कारले आदी मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमास बजाजनगर येथील नागरिकांसह यशवंत पब्लिक स्कूलचे शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
