
वाळूजमहानगर, (ता.24) – तिसगाव येथील म्हाडा कॉलनी परिसरातील सिद्धिविनायक गणपती मंदिराचा वर्धापनादिनानिमित्ताने पंधरावा अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यावेळी उद्योगपती तथा सिंगर दत्ताभाऊ गावंडे पाटील आणि पश्चिमचे युवा सेना तालुका अधिकारी राजेश भैय्या कसुरे यांच्या हस्ते मंगळवारी (ता.24) रोजी ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य काकासाहेब बुट्टे, संजय जाधव, मधुर हडे, विभाग अध्यक्ष अतुल दाभाडे, उपविभाग प्रमुख प्रदीप जमाले, पाटील तसेच उद्योगपती नामदेव मुसळे, डॉ. विष्णू काकडे, बाळासाहेब केरे पाटील, प्रमोद परळकर, संजय अनपट, घोलप नाना, परदेशी बाबा, रामभाऊ बनसोडे, सुनील चव्हाण, परमेश्वर मुंडे, एकनाथ दहिफळे, वानखडे आदी ज्येष्ठ नागरिक आणि महिला कार्यक्रमाला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी हिवाळे पाटील यांनी केले. व्यासपीठ चालक ह भ प उद्धव महाराज सानप आणि गोंडे महाराज यांच्या वाणीतून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाने सुरुवात झाली. ह भ प नंदाताई गव्हाणे महाराज बजाजनगर यांचे हरिकीर्तन रात्री 8 वाजता झाले. सात दिवस चालणाऱ्या या सप्ताहातील विविध धार्मिक कार्यक्रम साठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन सप्ताह समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
