
वाळूजमहानगर, (ता.27) – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हसला खुर्द येथे 26 जानेवारी गुरुवार रोजी 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांची लेझीम घेण्यात आली. यावेळी अनेक विद्यार्थ्यांची समयोचित भाषणे झाली. विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम तसेच देशभक्तीपर गीतं सादर केले. मान्यवरांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना बक्षिसे वितरित करण्यात करण्यात आली.
यावेळी सरपंच अनुराधाताई सुखदेव सपकाळ, उपसरपंच सुखदेव रामराम सपकाळ, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पोपट विश्वनाथ मोरे, शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष कौशल्या अंबादास साळुंके, पोलीस पाटील भिकन यादवराव साळुंके, ग्रामसेविका साळुंकेताई, तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर साळुंके, प्रतिष्ठीत नागरिक ध्रुपतराव तायडे, प्रतिष्ठीत नागरिक कडुबा शिंदे, आशाताई अर्चना साळुंके, अंगणवाडी सेविका सरला मोरे, अंगणवाडी सेविका परविनबी शहा, शांताबाई साळुंके, ज्योती बनकर, चंद्रकला संपकाळ, वामन बनकर,सलिम अजिमशहा, फारुख शेख, गणेश शेजूळ, अशोक सोन्ने,खंडु मोरे, कृष्णा साळुंके,लड्डुशहा, रशिद पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुख्याध्यापक प्रकाश शंकरराव झांबरे यांनी केले. तर शिक्षिका एस.बी.साळवे यांनी आभार मानले. यावेळी गावातील नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
