
वाळूजमहानगर, (ता.16) – वाळूज येथील सामजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य इस्माईल खान पठाण व पत्रकार हुरखान पठाण यांची नात मुशफेरा साबेर खान पठाण (7) हिने आपल्या जीवनातील रमजान चा पहिला रोजा शनिवारी (ता.15) रोजी पूर्ण केला.
कडक उन्हाळ्यातही तिने रोजा (उपवास) पूर्ण केल्याबद्दल तीचे आजोबा माजी ग्राम पंचायत सदस्य अन्सार खान पठाण, हाजी इब्राहिम खान पठाण, रियाझ खान, जावेद बेग, नसीर खान, शगिर खान, चेअरमन सर्जेराव भोंड, उपसरपंच योगेश आरगडे, पंचायत समिती सदस्य रामेश्वर मालुसरे आदींसह तीचे आई वडील व नातेवाईकाकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
